ताज्या घडामोडी

अवैध दारू तस्करी, एक लाख बावीस हजारचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपी फरार

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

स्थानिक पोलिस स्टेशन एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या पंदेवाही येते एका राहत्या घरी तब्बल एक लाख बावीस हजार रुपयांची अवैद्य देशी-विदेशी दारू लपवून ठेवली असल्याचे उघडकीस आले. सादर पोलीस हवालदार नीलकंठ सुकरु पेदाम यांचा गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा मारून दारुसाठा जप्त करण्यात आले.
या कारवाहीत दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली. किशोर बुकलू आत्राम रा.पंदेवाही, ता.एटापल्ली व मनोज जगदीश मुजुमदार रा.एटापल्ली असे पाळुन गेलेल्या आरोपी चे नाव आहे. पंदेवाही येथील किशोर आत्राम आरोपी यांचा घरी दारू साठा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घर तपासणी केली .त्यात गोवा व्हिस्की कंपनीच्या १८० मिलीच्या २५० निप किंमत ५०,०००रुपये व देशी रॉकेट संतरा दारू ९०० निप किंमत ७२,००० रुपये असा एकूण १ लाख २२ हजार रुपयेचा या ठिकाणाहून दारूचा पुरवठा किरकोळ केला जात असल्याचे तपासात समोर आले.
विशेष म्हणजे या महिन्यातील आरोपी यांचा वर दुसरा गुन्हा आहे. दोन दिवसाअधिक आरोपी मनोज मुजुमदार यांचावर उप पोलीस स्टेशन कसनसुर येते सुद्धा अवैध देशी-विदेशी दारू तस्करी चा गुन्हा दाखल झाले आहे. या दारू तस्करी मुळे अनेकाचे घर उध्वस्त झाले आहे. पूर्वी गुन्हा असून सुद्धा लागोपाठ आरोपी खुलेआम दारू तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. आरोप फरार असून त्याचे तस्करी चे काम जोमाने सुरू आहे. ही कारवाई सुनील पुटावार पोलीस उप निरीक्षक यांचा मार्गदर्शनात दादाजी करकोळ व मंगेश राऊत यांनी केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close