एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे खासगी वाहतुकदारांची चांदी ,प्रवाशांना आर्थिक फटका
मनसे कडून खासगी वाहनचालकांना गुलाबाचे फुल देऊन प्रतिकात्मक आंदोलन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सूरु असल्याने खासगी प्रवाशी वाहन चालक मात्र दुप्पट, तिप्पट तिकीट दर घेऊन ग्राहकांची लूट करत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असल्याने सर्व सामान्य प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचारी उपोषणावर बसल्याने सर्व सामान्य नागरिक जे बाहेरून आपापल्या गावी परततात त्यांचे मात्र प्रचंड हाल सहन करावे लागत आहे .प्रवाशांच्या नाईलाजाचा फायदा खासगी प्रवासी वाहतूक करणारे चालक मालक घेत आहे.अव्वा च्या सव्वा प्रवासी भाडे आकारून देखील कोंबड्यांप्रमाणे प्रवासी कोंबून वाहतूक होताना दिसत आहे .या वर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने असे प्रकार घडत आहे. प्रवाश्यांची लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा तर्फे खासगी वाहनांच्या चालक व वाहक यांना गुलाबाचे फुल देऊन प्रवाशांना लुटू नका अशी विनंती करण्यात आली.
नागपूर वरून वरोरा येणाऱ्या प्रवाशांकडून 250 ,300,400 या प्रमाणे बिनहिशोबी प्रवासी भाडे वसूल करून प्रवाशांची लूट होत आहे .एकीकडे कोरोना मुळे आधीच पिचलेला सर्वसामान्य नागरिक त्यावर खासगी वाहनचालकाकांकडून झालेली लूट या मुळे सर्वसामान्य नागरिक मेल्याच्या अवस्थेत आहे.यावेत वेळीच वचक बसावा या मागणी साठी उपविभागीय अधिकारी वरोरा व ठाणेदार साहेब वरोरा यांना निवेदन देत यावर लवकरात लवकर नियंत्रण आणा अशी विनंती करण्यात आली .परंतु पुढील 2 दिवसात यावर नियंत्रण न आल्यास चक्का जाम आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाअध्यक्ष वैभव डहाने यांनी दिला.निवेदन देते वेळी राहुल खारकर , मुज्जमील शेख ,प्रशांत बदकी,राहुल लोणारे ,कुणाल गौरकार,अभिजित अष्टकार, शरद पुरी,गणेश खडसे ,राजुभाऊ धाबेकर, विकी येरणे, रोहित पिंपळशेंडे,प्रतिक मुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.