ताज्या घडामोडी

मुल तालुक्यातील विविध विकास कामाची आढावा सभा

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

पंचायत समिती अंतर्गत कन्नमवार सभागृह मूल येथे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांचे उपस्थितीत मूल तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
सदर कार्यशाळेसाठी रोशनी खान सभापती महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर, रेखाताई कारेकर उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, चंदूभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मूल, पृथ्वीराज अवथळे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, श्री. कपिल करोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री. किरवे साहेब जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर, श्री.मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मूल, पूजाताई डोहने पंचायत समिती सदस्य मुल, वर्षाताई लोनबले पंचायत समितीचे सदस्य मूल व मूल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच महोदय तसेच संपूर्ण विभागाचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आढावा सभा संपन्न झाली.
सदर सभेत चालू आर्थिक वर्षातिल विकास कामाचा आढावा घेण्यात आला व दिनांक 31 मार्च पूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावेत अश्या सूचना देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग , नरेगा विभाग, उमेद विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग, स्वच्छ भारत विभाग व इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close