ताज्या घडामोडी

चिनोरा येथिल पारधी उत्थान कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र अंकुश शेरकुरे यांच्या पाठपुराव्याला यश.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा-पारधी समाजातील बहुतांश लोकांकडे रेशनकार्ड , आधार कार्ड , जातीचे दाखले नाही वनजमिनीचे पट्टे , महसूल जमीनीचे पट्टे ,घराचे पट्टे नाही मतदार ओळखपत्र , संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना , अर्थसहाय्य योजना व ईतर शासकीय योजना पारधी समाजाला मिळालेल्या नाहीत म्हणून आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र अंकुश शेरकुरे यांनी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांचे कडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता , तसेच संविधान फाऊंडेशन चे अध्यक्ष इ. झेड. खोब्रागडे माजी सनदी अधिकारी नागपूर व आदिम महासंघाचे राष्ट्रीय महासचिव बबनराव गोरामण यांनी विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे वर्मा व आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन पारधी समाजाला जातीचे प्रमाणपत्र ,जमीनीचे पट्टे ,व इतर शासकीय योजना देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली होती. त्याचा आधार घेऊन विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे वर्मा यांनी महसुल विभागाला आदेश दिले होते , परंतु पारधी समाजापर्यंत योजना पोहचत नव्हत्या, व पारधी समाजातील लोक तिथपर्यंत पोहचत नव्हते शासनाच्या विविध योजना ह्या जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर राबविल्या जातात या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गोरगरीब जनतेला जिल्हा किंवा तालुका स्तरावर यावं लागते गावापासून दूर दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास तालुका प्रशासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी योजनांची माहिती मिळावी या हेतूने वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे व तहसीलदार रोशन मकवाने यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करत वरोरा तालुक्यातील चिनोरा पारधी टोला पिपरबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दोन दिवसीय दि ३१/३/२०२२ते १/४/२०२२शिबीर आयोजित करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते, शिबिरामध्ये चिनोरा पारधी टोला पिपरबोडी ,मजरा रै पारधी टोला ,हिरापुर बेडा ,कोंढाळा बेडा,येवती टोला,शेगाव खुर्द , रामपुर,व नागरी येथील पारधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, अनेक लोकांकडे रेशनकार्ड , जातीचे प्रमाणपत्र, व जमिनींचे पट्टे व निराधार योजनेचा लाभ मिळत नसल्याचे उपस्थित तहसीलदार यांना बोलुन दाखवले पारधी बांधवांना लवकरच पट्टे वाटप व जातीचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे तहसीलदार रोशन मकवाने यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे, सुनील घोसरे, राजेश शेरकुरे ,चिनोरा ग्रा.पं. सरपंच ताई परचाके , ग्राम विकास अधिकारी एकनाथ चाफले, पोलीस पाटील रूपेश ढोके, रवींद्र शेरकुरे , आनंद ढोके , मंडळ अधिकारी ,तलाठी, सचिव व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close