नागभीड येथे दारू सह 5,63,000/-रु चा मुद्देमाल जप्त
ग्रामीण प्रतिनिधी:कु.कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
प्राप्त गोपनीय माहिती नुसार पो नि मडामे सा.यांचे मार्गदर्शना खाली पोउपनि किशोर धोपाडे ,पोशि अजीत शेंडे, पोशी रोहित तुमसरे,पो शी कुणाल पतरंगे पोशी नीतीन डाखोळे यांनी राम मंदिर चौक नागभीड मेन रोडवर नाकाबंदी करुन मारुती स्विफ्ट कंपनीची कार क्र .MH 03 AZ 0124 ची अवैध दारू बाबत पाहणी केली असता कार मध्ये एकूण 09 खरड्याचे खोक्यात प्रत्येकी खोक्यात 100 नग प्रमाणे एकूण 900 नग देशी दारूच्या प्रत्येकी 90 मिली ने भरलेल्या प्लास्टिक च्या शिश्या की. 63000/-रु. व दारू वाहतुकी करिता वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची कार क्र MH 03 AZ 0124 कीं 50000/-रु
असा एकूण कीं – 5,63,000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी नामे योगेश्वर नानाजी गहाने वय 34 वर्ष रा. वाढोणा ता.नागभीड यास ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध पोस्टे नागभीड येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.