नाशिक येथिल पोलीस मिञ परिवार समन्वय समिती आढावा बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष
मा.डाँ.संघपाल उमरे,मा.श्री.सुभाषदादा सोळंके महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,मा.श्री.विनोद पत्रे सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष मा.माधुरी गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली हाँटेल गोदावरी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र, व नाशिक जिल्हातील सर्व पदधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.त्याप्रसंगी श्री.सुनिल परदेशी,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांनी व मा.माधुरी गुजराथी मँडम यांना सभेचे अध्यक्ष स्थान स्विकारण्यास विनंती करण्यात आली.
राजेंद्र आहेर व पूजादिदी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
गुजराथी मँडम यांचा नाशिक टिमच्या वतीने कामिनी भानुवंशे मँडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
ह्या प्रसंगी सदर सभेमध्ये उपस्थित प्रत्येक सदस्याने आपल्या नावाचा परीचय व करीत असलेल्या कार्याची माहिती प्रमुख पाहुण्यांना दिली.
संस्थेची कार्य पध्दती, समितीचे ध्येय-धोरणाविषयी, नियमावली विषयी व पोलीस विभाग व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कार्य पध्दती विषयी सविस्तार माहिती माधुरी गुजराथी मँडम यांनी अतिशय सुरेख पद्धतीने दिली
मा.सुनिल परदेशी सरांनी सामाजिक कार्य करतांना त्यांना प्रत्यक्ष आलेले अनुभव सर्वासमोर सांगितले कारण प्रत्येक सभासदांनी या अनुभवातून प्रेरणा घ्यावी
आढावा बैठकी मध्ये अनेक महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा तसेच लिगल हेड वैद्यकीय टिम,माजी न्यायपालिका न्यायधिश,माजी पोलीस अधिकारी यांना सुध्दा समितीचे मार्गदर्शक म्हणून पोलीस मिञ परिवार समन्वय समिती मध्ये वरिष्ठांन सोबत चर्चा करुन लवकरच समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे.
तसेच पुढील काळात समितीच्या कार्य बद्दल व विविध प्रकारच्या उपक्रमा बाबत सखोल चर्चा व नियोजन करणे बाबत विचार विनिमय करण्यात आले.येणाऱ्या नवीन वर्षात नियुक्ती पत्र व ओळखपञ वाटपाचा कार्यक्रम नाशिक मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल याबातही सर्वांनच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली.
समारोप प्रसंगी राजेंद्र आहेर यांनी आभार मानून आढावा बैठक संपल्याची घोषणा केली या बैठकी मध्ये महिला पदाधिकारी यांची उपस्थिती चांगली असुन अशोक वराडे,राजेंद्र आहेर ,पंकज वारुळे,पिंटू भाऊ थोरात,परवेज सैय्यद ,लक्ष्मण जगदाळे , कामिनी भानुवंशे,पुजा जाधव,रेखा गिते मंजुषा लोहगावकर,विजया जाधव , सिमी राणा,मंगल मोकळ,रोहिणी जाधव, वंदना परदेशी,सोनली भोजणे आदी सर्व उत्तर महाराष्ट्र,नाशिक जिल्हा व जिल्हातील पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.