पालांदरच्या गोविंद विद्यालयात मतदान जनजागृती

प्रतिनिधी : नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा :-जिल्ह्यात मिनी मंत्रालयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यात पात्र नागरिकांनी मतदान करावे, याकरिता पंचायत समिती लाखनी व शिक्षण विभागातर्फे जनजागृती सुरु आहे.

त्याचाच आधार घेत पालांदूर येथील गोविंद विद्यालयातील विद्यार्थिनींनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला. प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या वीकासाकरिता व देशाच्या प्रगतीकरिता देशहित जपत आपले कर्तव्य करण्याकरिता तत्पर असावे. देशहित साधले तर व्यक्तिगत हित नक्कीच साधले जाते. तेव्हा भारतीय संविधानाच्या आधारे मिळालेल्या मतदानाचा उपयोग सकारात्मक दृष्टीने व्हावा याकरिता शासन व प्रशासन स्तरावरुन नाना त-हेने नाना प्रयत्न केले जात आहेत. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील गोविंद विद्यालयातील शिक्षिका रेखा पाखमोडे चेतना कर्जेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत दिशांत खंडाईत या विद्यार्थिनीने सुरेख रांगोळीतून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अगदी नजरेत भरणारी ही आकर्षक रांगोळी सर्वांनाच प्रेरणादायी वाटली. देशहित व आपले कर्तव्य साधताना मतदान हेच प्रभावी शस्त्र असल्याचे रांगोळीतून साकारलेले आहे. कोणत्याही मोहाला बळी न पडता अथवा कोणतीही कारणमिमांसा न करता मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन शेंडे, संगीत शिक्षक भास्कर पिंपळे यांच्या उपक्रमाने शाळेतील विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी होऊन स्वतःतील कलागुणांना साकारत आहेत. कोरोनाच्या संकटाने शाळा, महाविद्यालय गेली दीड वर्षे बंद होती. विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न पडला होता. मात्र, शिक्षक, पालक, शासन यांच्या दृढनिश्चयाने पुन्हा शाळा गजबजल्या विद्यार्थ्यांची किलबिल सरु झाली