सोयाबीनचा अचानक भाव पाडणे हा खूप मोठा घोटाळा-सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सोयाबीनचा भाव अचानक कमी करनारी खूप मोठी टोळी असून या घोटाळ्याची चौकशी करत सोयाबीनला पंधरा दिवसापूर्वी चा दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
गुरुवारी परभणी जिल्हाधिकारी यांना गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता .चांगला भाव येणार आहे अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीनला आगाऊ फवारणी व खतांचे डोस दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात पिके गेली असून सोयाबीन भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नसल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे भाव कमी करण्याचा हा खूप मोठा देशस्तरावर चा घोटाळा असून या घोटाळ्यातील संबंधितांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी मात्र भाव पडल्यामुळे हताश झाला असून कमी झालेल्या भावाने काढणीचा खर्च निघणार नाही अशी अवस्था आहे. या निवेदनावर परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजी महाराज बोबडे, ऊबरवाडी चे सरपंच धारबा हाके ,भाजपाचे सय्यद मुदस्सीर, आरबुजवाडी चे रमेश मुंडे उपस्थित होते.