आनंद निकेतन महाविद्यालय येथे २४ तास सूर्यनमस्कार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा -“आजादी का अमृत महोत्सव ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प” या राष्ट्रीय अभियानाचा एक भाग म्हणून महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,क्रिडा भारती,चंद्रपूर जिल्हा योगासन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित,आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणावर २४ तास सूर्यनमस्कार करण्याचा मानस गणतंत्रदिनाच्या शुभसंध्येला पूर्ण करण्यात आला, दि.२५/१/२०२२ ला सायंकाळी ६ वाजता सुरु केलेले हे अभियान,दि.२६/१/२०२२ ला सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाले.यात एकून १६२ विद्यार्थी तसेच योगसाधकांचा सहभाग होता २४ तासात एकून ९९१९ सूर्यनमस्कार करण्यात आले.

समारोपीय सोहळ्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य मृणाल काळे,प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य राधा सवाने व विशेष अतिथी म्हणून योग अध्यापक श्री.दीपक शिव तसेच अतिथी म्हणून प्रा. अरविंद सवाने व मा.श्री.बघिले सर उपस्थित होते.या अभियानाचे नियोजन करणारे महाविद्यालयाचे क्रिडा प्रमुख व समन्वयक प्रा.तानाजी बायस्कर व आयोजन समिति विद्यार्थी प्रमुख कुणाल दातारकर व आनंदवनाचे उपसरपंच श्री.शॊकत खान ,म.से.स. कार्यकर्ते श्री.अविनाश कुलसंगे व सर्व खेळाड़ू उपस्थित होते,या प्रसंगी सर्व मान्यवरानी मनोगत व्यक्त करून सहभागी साधकांचे अभिनंदन करून कॊतुक केले. या कार्यक्रमाचे संचलन महेश सोनवाने यांनी केले तर आभार. तानाजी बायस्कर यांनी मानले या कार्यक्रम स्थळावर मा.डाॅ.विकास आमटे यांनी भेट देऊन शुभाशीर्वाद दिले व आनंदवनवनाच्या वतीने उपक्रमाला शुभेच्छा दिल्या,वॆद्यकीय अधिकारी मा.डाॅ.भारती आमटे,संस्थेचे विश्वस्त मा.श्री.कॊस्तुभ आमटे ,सॊ.पल्लवी आमटे , विश्वस्त डाॅ.विजय पोळ,मा.श्री.सुधाकर कडू मा.सदाशिव ताजणे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या! या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रत्यक्षीकरण यु ट्युब चॅनेलवर वरून प्रसारीत करण्यात आले भारत आणि इतर ५ देशात साधकांनी हा उपक्रम पाहिला आणि अभिनंदनचा वर्षाव केला!