परमपूज्य श्रीसाईबाबांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी ते पंढरपूर दिंडीचे आज रविवार दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी प्रस्थान झाले असून, श्रीसाईबाबांची देशभरातील पंढरपूरला श्रीविठ्ठलाच्या भेटीला जाणारी ही एकमेव दिंडी आहे. गेल्या 21 वर्षांपासून श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर, श्रीसाई स्मारक समिती, पाथरी संस्थानने ही परंपरा जोपासली आहे. असे समितीचे कार्यकारी अधिकारी तथा दिंडीप्रमुख अॅड. मुकुंदराव चौधरी म्हणाले.
दरवर्षी ही दिंडी कार्तिक वद्य द्वादशीला प्रस्थान होऊन मार्गशीर्ष शुध्द एकादशीला पंढरपूरला पोहोचते परमपूज्य श्रीसाईबाबांचा रथ, पालखी, पताका, विणा, टाळ-मृदंगाच्या गजरात ही दिंडी दरवर्षी पायी जात असते, मोठ्या संख्येने भक्त या दिंडीत विठू माऊली च्या भेटीला जात असतात, या दिंडीत जाणाऱ्या भक्तांकडून व वारकऱ्यांकडून कुठलीही फीस आकारली जात नाही.

श्रीसाईभक्तांसाठी ही दिंडी पूर्णतः मोफत असते. परंतु मागच्या वर्षीपासून (covid-19) कोरोनाच्या शासकीय निर्देशांचे पालन करत ही दिंडी फक्त 20 वारकऱ्यांना सह जीपने श्री साईबाबांच्या पादुका घेऊन जात आहे. आज सकाळी 7:00 वाजता परमपूज्य श्रीसाईबाबांचे कुलदैवत पंचबावडी हनुमान मंदिर माळीवाडा येथे दर्शन करून ही दिंडी पंढरपूर कडे जीपने निघाली आहे. प्रसंगी श्रीसाई स्मारक समितीचे कार्यकारी विश्वस्त अॅड. अतुलराव चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी ना. के. कुलकर्णी, दिंडीप्रमुख अॅड.मुकुंदराव चौधरी, बंडू मामा दिवाण, मंदिर प्रमुख छाया कुलकर्णी, सुजाता डहाळे, प्रभाकर पाटील, अण्णासाहेब कांबळे तसेच इतर भक्तजन उपस्थित होते.
या दिंडी सोबत ह भ प पांडुरंग महाराज धायडे, प्रकाश महाराज धर्मे, शंकर महाराज सीताफळे, वशिष्ठ महाराज जगदाळे, मनोहर महाराज थोरे, आणेबा बनगर, अप्पाराव खडके, दिनकर चपाटे, मोहन महाराज पोपळघट, विजय चींचाने, रतन गिराम, धुराजी उकलकर, शत्रुघ्न महाराज, आप्पासाहेब कोल्हे, इत्यादी वारकरी आहेत. परमपूज्य श्रीसाईबाबाच्या पादुकां सोबत पुरोहित म्हणून वे.शा.सं. उमेश गुरू जोशी हे आहेत.
दरवर्षीच्या यजमानांना व भक्तांना पवित्र पादुकांचे दर्शन देत ही दिंडी उद्या दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी पंढरपूर येथे पोहोचून दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी एकादशीच्या दिवशी नगरप्रदक्षिणा करून सकाळी 9:00 वाजता विठू माऊलीच्या भेटीला श्रीविठ्ठल मंदिरात जाणार आहे. विठू माऊली चे दर्शन करून दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी परत पाथरी मुक्कामी येणार आहे अशी माहिती श्री साई स्मारक समिती चे प्रताप आम्ले यांनी दिली.