जनता दरबार च्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजनांचे लाभ घ्यावा : आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
बोरी :- आगामी ३ फेब्रुवारीला बोरी स्थित ग्रामपंचायत कार्यालयात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम हे जनता दरबार घेणार आहे. आयोजित जनता दरबारात क्षेत्रातील नागरीकांनी आपल्या विविध समस्यांना घेवून उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
जनता दरबारात सर्व सामान्य जनतेच्या समस्यांचे निवेदन स्वीकारने, बोरी परिसरातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आमदार धर्मरावबाबा आत्राम करणार आहेत.
शासनाच्या विविध योजनांचे प्रस्ताव तयार करणे व सरकारी योजनांचा लाभ स्थानिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.आयोजित जनता दरबारात बोरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. या जनता दरबारात तहसीलदार, प्रकल्प अधिकारी,गट विकास अधिकारी,कृषी अधिकारी,विज वितरणचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच बांधकाम विभागासह इतर विभागाचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित राहणार असून त्याच्या माध्यमातून आपल्या समस्याचे निराकरण करण्यात येईल प्रयत्नशील राहील
जनता दरबार – :काम तुम्हचं जबाबदारी आम्हची प्रांत कार्यालय ,तहसील कार्यालय ,तलाठी कार्यालय ,पंचायत समिती, वन विभाग, कृषी विभाग, एम एस ई बी ,रेशन कार्ड, बांधकाम, निराधार महिला ,संजय गांधी, विविध योजना व इतर सर्व समस्या