ताज्या घडामोडी

रेती माफियांचे मुसक्या आवरण्याचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले लेखी आश्वासन

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

चंद्रपूर :- वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून मागील काही दिवसापूर्वी वर्धा नदीतून रेती उत्खनन केलेल्या खड्ड्यात एक गुराखी पडून मरण पावला होता, पण यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही, उलट पुन्हा रेती चोरीच्या घटना वाढल्या आहेत अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदने देवून या अवैध रेती चोरीवर आळा घाला अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा दिला होता, पण तरीही महसूल प्रशासनाने याची दखल घेतली नव्हती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असे म्हणणे आहे की तालुक्यातील नदी नाल्यातून जे रेतीचे अवैध उत्खनन होत आहे, त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे, शिवाय सर्वसामान्य जनतेला घर बांधकाम करण्यासाठी चढ्या भावाने म्हणजे अव्वाच्या सव्वा भावाने रेती माफियाकडून रेती विकत घ्यावी लागत आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाने रेती घाटावर आपला एक प्रतिनिधी ठेवून शासनाच्या दरात सर्वसामान्यांना रेती उपलब्ध करून द्यावी, रेती घाटावर सीसीटीव्ही कैमेरे लावावे व अवैध रेती उत्खनन थांबवावे अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे व सहकाऱ्यांनी निवेदन दिले होते पण त्यावर महसूल विभागाने दखल घेतली नाही, उलट वैभव डहाणे यांच्या हॉटेल वर येवून काही रेती तस्करांनी पाहून घेण्याची धमकी दिली, त्यामुळे मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी महसूल प्रशासनाच्या विरोधात वरोरा तहसील कार्यालयातील टॉवर वर चढून विरूगिरी आंदोलन पहाटे ४.०० वाजेपासून सुरू केले होते,

जोपर्यंत महसूल विभागाचे अधिकारी मागणी च्या संदर्भात लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली उतरणार नाहीअशी भूमिका मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती, अशातच मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसे नेते रमेश राजूरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, हे आंदोलन स्थळी उपस्थित झाल्याने मनसेचे विरूगिरी आंदोलन पेटेल अशी शक्यता होती. मात्र उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या शिष्टाईने व तहसीलदार काळे व नायब तहसीलदार रमेश कोळपे, उपपोलिस निरीक्षक मिश्रा यांच्या मध्यस्थीने मनसेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या व तसे लेखी आश्वासन देण्यात आले, या विरूगिरी आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शरद मडावी, मोहसीण सय्यद,अजिंक्य नरडे, वाळू थेरे, सौरभ खापणे,अतुल वानखेडे, हिमालय मडावी व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close