ताज्या घडामोडी

पोळसा येथे विराआंसचे रास्ता रोको आंदोलन

स्वतंत्र विदर्भाच्या घोषणांनी दणाणली विदर्भ – तेलंगणाची सिमा

आव्हानांचा सामना करून विदर्भ राज्य मिळविणारच – ॲड.वामनराव चटप

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, विदर्भके युवाओंने ललकारा है, विदर्भ राज हमारा है अशा नागरिक, युवक व कार्यकर्त्यांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी विदर्भ – तेलंगणा सिमेवरील पोळसा गाव दणाणून गेले. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी पोळसा येथील वर्धा नदीच्या पुलाजवळ विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनापूर्वी झालेल्या सभेत माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी विदर्भ राज्याचा लढा, त्यासाठी ११९ वर्षापासून सुरू असलेला संघर्ष, त्यासाठी झालेली विविध आंदोलने, विदर्भ करार न पाळल्याने झालेला अन्याय आणि या स्वतंत्र विदर्भामुळे होणारे फायदे व सुटणारे जटील प्रश्न याविषयी सविस्तर माहिती आपल्या भाषणात दिली. यानंतर कार्यकर्त्यांनी पाऊण तास रास्ता रोखला. या आंदोलनात गोंडपिपरी तालुक्यातील बत्तीस गावातील शेकडों नागरिक आणि विविध राजकिय पक्षाचे विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान पोलिस प्रशासनानाच्या वतीने या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी बोलतांना ॲड. वामनराव चटप म्हणाले की, विदर्भातील जनतेच्या ख-या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला हा लढा सतत सुरू राहणार असून स्वतंत्र विदर्भासाठी येणारी सर्व आव्हाने स्विकारून विदर्भ राज्य मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. शालिक माऊलीकर यांनी विदर्भाचा लढा निकराने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सर्व विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची शपथ घेतली. विदर्भ राज्याच्या फलकाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
सदरहु आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलनाचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.वामनराव चटप,निळकंठ कोरांगे, शालिक माऊलीकर,कपील इद्दे,रमेश नळे,आनंद खर्डीवार,मोरेश्वर सुरकर,अरूण वासलवार,डाॅ.अशोक कुडे,मदन खामनकर,ॲड.रूपेश सुर, ॲड.प्रफुल्ल आस्वले,रमेश घुडसे, किरमिरी सरपंंच अनुराग फुलझेले, भारत घ्यार,सुर्यकांत मुंजेकर,वासुदेव चटारे,जयसिंग मोरे, साईनाथ फुलमारे, विश्वनाथ लोखंडे, श्यामराव गिरसावळे, गजानन निकोडे, राजु कातरकर, जानकीराम सुर, कालिदास घ्यार, बापुराव येलमुले, रामदास वाघाडे, डोणुजी मांडवकर, अतुल लडके, भरत खामनकर, शेखर बोनगिरवार सुनिल बावणे,रमाकांत मालेकर,रमेश नळे,अतुल लडके,प्रशांत ठाकरे,डाॅ.पुंडलिक काळे,पुंडलिक गोठे,विनोद वडस्कर, पांडूरंग भोयर,मारोती पोटे,संदीप पुडके,विलास ढोडरे,मारोती पोटे, विनोद कुत्तरमारे,विलास शिडाम, मिराबाई कोरडे, सुनिता वडस्कर यांचेसह अनेक पदाधिका-यांनी केले.
संपुर्ण विदर्भातील सिमावर्ती भागातील रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलनाच्या मालिकेतील हे पाचवे आंदोलन होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close