ताज्या घडामोडी

गोंडपिपरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी सौ.रेखा सुधाकर रामटेके यांची निवड

ग्रामीण प्रतिनिधी: महेश शेंडे
विठ्ठलवाडा

दिनांक 25 -6 -2020 शुक्रवारला गोंडपिपरी येथील खैरी कुणबी समाज भवन येथे तालुका महिला काँग्रेसचा महिला मेळावा आयोजित केला होता.त्या मेळाव्यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुभाषभाऊ धोटे उपस्थितीत होते.आणि गोंडपीपरी तालुक्यातील महिला काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.त्यात मान.आमदार साहेब यांनी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा सादर केला.आणि त्यांनी गोंडपिपरी तालुक्याला विविध विकासकामे करून दाखवू असे आश्वासन दिले.तसेच आमदार साहेब यांनी गोंडपिपरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष पद यांची घोषणा केली त्यात ग्रामपंचायत विठ्ठलवाडा येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.रेखा सुधाकर रामटेके यांची तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close