ताज्या घडामोडी
विठ्ठलवाडा येथे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणांर्थ वृक्षलागवड

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने तर संपूर्ण देशात हाहाकार माजविलेला असून या कोरोनाच्या माहामारिने संपूर्ण कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.समनी माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.अश्याच पीडित व्यक्तींना सामाजिक बांधिलकीतून कुठे अन्याधाण्याची मदत तर कुठे अर्थसहाय्य पुरविण्यात येत आहे.
याच सामाजिक वैचारिक भावनेतून दिनांक 14 जुलै ला कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या घरी त्यांच्या स्मरणार्थ त्याची आठवण म्हणून विठ्ठलवाडा येथे झाडे लावण्यात आली.
यात विठ्ठलवाडाचे ग्रामपंचायत सदस्य रेखा रामटेके,दर्शना दुर्गे,शुभम पिंपळकर तसेच मृतकाच्या कुटुंबातील सदस्य सिद्धार्थ दुर्गे,छाया अलोने उपस्थित होते.