ताज्या घडामोडी

शेअरमार्केट गुंतवणुकीदरम्यान अधिक नफ्याचे अमिष दाखवून एकाला तीन लाखाला गंडवले

पाटण तालुक्यातील प्रकार. एका महिलेस अटक.

प्रतिनिधीःप्रमोद राऊत कराड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर यशवंत मोळावडे राहणार नाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तेलेवाडी तालुका पाटण येथील किशोर शिवलिंग माळी व प्रतीक्षा शिवलिंग माळी यांनी संगणमत करून फिर्यादी शंकर मोळावडे यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले तसेच त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे या फिर्यादित म्हटले आहे…या प्रकरणी प्रतीक्षा माळी हिला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे…फिर्यादी कडून जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे…अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वेताळ करीत आहेत…दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून पाटण तालुक्यातील बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून आणखीही काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close