वंचित बहुजन आघाडी च्या मेळाव्याच्या दिवशीच कार्यकर्त्यांनी घेतला भाजप प्रवेश
आमदार बंटी भाऊ भांगडिया वर विश्वास ठेवून डॉ श्यामजी हटवादे यांच्या पुढाकारातुन घेतला भाजप प्रवेश .
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नेरी येथिलप्रसिद्ध अर्जनविस तथा वंचित चे कार्यकर्ते चंदू मारोती गेडाम व सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर सुप्रतिक कर्मपाल भैसारे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या कार्याचा झंझावात पाहून
तसेच या पक्षात सर्वांना मिळत असणारी समान वागणूक पाहून त्यांच्या नेतृत्वावर जबरदस्त विश्वास ठेवून भाजपमध्ये
वंचित बहुजन आघाडी ला धक्का देत प्रवेश घेतला. आमदार बंटी भाऊ भांगडिया यांनी या क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे करून लोकप्रियता निर्माण केली तसेच गोरगरीब लोकांना त्यांच्या अडचणी सामाजिक ,आर्थिक, शैक्षणिक यावर मात करण्यासाठी मदत करू त्यांचे जीवनमान उंचावले. विविध क्षेत्रात कार्य करण्याची त्यांची वेगळी शैली लोकांना मोह टाकणारी आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांंनी या पक्षात प्रवेश घेतलेला आहे. याप्रसंगी आमदार बंटी भाऊ भांगडिया यांनी दोघांचे टॉवेल तसेच पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी डॉक्टर श्यामजी हटवादे(महाराष्ट्र प्रदेश सदस्य भाजपा कार्यकारिणी), राजू पाटील झाडे (तालुका अध्यक्ष भाजपा), माया ननावरे (तालुका अध्यक्ष महिला आघाडी), तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.