ताज्या घडामोडी
धोकादायक विहीरी उठली जनतेच्या जिवावर
नगर परिषद चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
मो.8975413493
चिमुर नगर परिषद अंतर्गत पिसे पेट्रोल पंप जवळ संताजी नगर मधील विहीर उघड्यावर असल्याने धोकादायक विहीर आता लहान बालक व संताजी वासियांच्या जिवावर उठली आहे.
संताजी नगर वासीयांनी नगर परिषद ला वारंवार कल्पना व निवेदन देऊन सुद्धा नगर परिषद वारंवार दुर्लक्ष करित असल्याने जनुकाही नगर परिषद च जनतेच्या जिवावर उठली आहे.ही विहीर खाजगी प्लाट धारकाची असून त्यांना सुद्धा वारंवार कल्पना दिली पण त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले.
या विहीरित ट्रॅक्टर, जनावरे पडलेली आहे.ही विहीर तात्काळ बुझविण्याची मागणी या परिसरातील जणतेनी केली आहे.जर या विहीरीमुळे जिवीतहानी झाल्यास नगर परिषद जबाबदार राहील असा इशारा लोकांनी दिला आहे.