खापरी धर्मु येथे समता सैनिक दल शाखा उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी:योगेश मेश्राम चिमुर
चिमूर तालुक्यातील मौजा खापरी धर्मु येथे नुकत्याच दिनांक १२/१/१०२४ ला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता सैनिक दल च्या माध्यमातून शिल,शौर्य,बलिदान हा विचार समाजात रुजावा, याकरिता दीक्षाभूमी नागपूर समता सैनिक दल संघटक श्री घनश्याम फुसे सर तर मुख्य निमंत्रक सुनील शेंडे सर यांच्या विचारांना प्रेरित होऊन २५ ते ३० महिलांनी पुढाकार घेऊन समता सैनिक दल शाखा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व मानवंदना सलामी देऊन समता सैनिक दल रॅली काढण्यात आली .रॅलीत राजमाता जिजाऊ, सावित्री बाई फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रतीकृती वेशभूषा करून शुभारंभ करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटक घनश्याम फुसे सर नागपूर होते तर प्रमुख अतिथी निमंत्रक सुनील शेंडे सर नागपूर ,समन्वयक राजरत्न कुंभारे सर नागपूर,महेश नंदेश्वर , धनमाला गोंधाने,प्राध्यापक अनिल भांगे सर ,शीला रंगारी,भारतीय बौद्ध महासभेचे नारायण कांबळे सर चिमूर,जितेंद्र घोडेस्वार नागपूर उपस्थित होते .मान्यवरांचे हस्ते समता सैनिक दल नामफलक उद्घाटन करण्यात आले. शीलवान सैनिक मध्ये देश बदलविण्याची ताकत असते अध्यक्ष फुसे यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनमाला गोंधने सूत्रसंचालन प्रकाश मेश्राम तर आभार सुमन मेश्राम यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करणे करिता उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.