ताज्या घडामोडी

२० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा-खा.नेते

गोंदियातील डीपीसी बैठकीत सर्वप्रथम अभिनंदनाचा ठराव..

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

शेतकऱ्यांच्या हित जपणारे युतीतील राज्य सरकारने यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा चांगला फायदा होईल, असे डीपीसी सुरू होताच सर्व प्रथम या निर्णयासाठी राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठरावा गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. त्याला सर्वांनी एकसुरात प्रतिसाद देत हा ठराव संमत केला.आज राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत शेतकऱ्यांच्या हिताचे केंद्र व राज्य सरकार आहे.असे मत खा.नेते यांनी व्यक्त केले.

गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री परिणय फुके, आ.अभिजित वंजारी, आ.विनोद अग्रवाल, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ.सहसराम कोरेटी, आ.विजय रहांगडाले, गोंदियाचे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी चिन्मय गोटमारे, पो.अधीक्षक निखिल पिंगळे, सीईओ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कचारगड देवस्थान आले अ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा

लाखो आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानाला ब मधून अ श्रेणीचा दर्जा देण्याचा ठराव डीपीसी बैठकीत घेण्यात आला. याशिवाय ढासगडला क मधून ब श्रेणीत टाकण्याचा ठराव घेण्यात आला. बामणी ते धानोली रेल्वे क्रॅासिंग रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून पेंडींग आहे. परिणामी २५ किलोमीटरचा फेरा पडत आहे. त्यामुळे हे काम लवकर सुरू करावे, अशीही सूचना यावेळी खा.नेते यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close