पोलीस मित्र परिवार समन्यवय समिती व पोलीस दक्षता समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी सौ.आचल गोयल यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिनांक 05/ 08 / 2021 रोजी गुरुवार रोजी परभणी येथे ठिक दुपारी तिन वाजता नुतन, नविन जिल्ह्यधिकारी मा. सौ.आचल गोयल हया परभणी जिल्हधिकारी कार्यालयात रूजु झाल्या बद्दल पोलीस मित्र परिवार समन्यवय समिती आणि पोलीस दक्षता समिती यांच्या वतीने मा.महिला जिल्हाधिकारी कलेक्टर, सौ.आचल गोयल यांचा सत्कार करण्यात आला आचल गोयल मँडम यांनी आमच्या कार्या बद्यल व तुम्ही काय काम करता याची चौकशी केली व परीचय घेण्यात आला महिला बचत गट या विषयावर मा. आचल मँडम यांनी चर्चा व माहिती विचार पुस केली अशा प्रकारे नविन रूजू झालेल्या परभणी महिला जिल्ह्यधिकारी मा.सौ.आचल गोयल यांचा सत्कार करतांना सामाजिक कार्यकर्तेत्या व पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष सौ.रेखाताई मनेरे पोलीस दक्षता समितीच्या आणि इतर सर्व महिला पदधिकारी सौ.जयश्री पुंडगे सौ.वंदना जोंधळे सौ.गाडे ताई सौ.ममताज बेगम भाभी ,रेखा मनेरे हया महिला सामाजिक कार्यकर्तत्या ऊपस्थित होत्या.