ताज्या घडामोडी
चंद्रपूरात प्रजासत्ताक दिनी कर्जमुक्त अभियानचा शुभारंभ
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
धार्मिक एकता ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कर्जमुक्त भारत अभियानने मोठे स्वरूप धारण केले असून ही चळवळ सर्व स्तरांवर यशस्वी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान काल प्रजासत्ताक दिनी दुपारी ११वाजता स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालया जवळ झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर , राजूरा, भद्रावती, वरोरा, जिवती येथील अनेक नागरिक सहभागी झाले होते.पार पडलेल्या या कार्यक्रमाला धार्मिक एकता ट्रस्टच्या चंद्रपूर लोकसभा प्रभारी नागपूर निवासी गीता अरुण मेहर,प्रणिता सुनिल बोरकर,फिरोज खां पठाण, जमीसुद्दीन के.सय्यद ,संजय पुरके, अधिवक्ता रवींद्र उमाठे,प्रकाश रेड्डी, साक्षी चिल्लेवार, पुंडलिक गोठे आदिं उपस्थित होते.