साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे होळी उत्सव संपन्न

साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे होळी उत्सव संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे सकाळी विशाखापट्टणम येथील 50 साई भक्तांचा ग्रुप होळीच्या शुभमुहूर्तावर बाबांचे दर्शन घेण्यासाठी आला होता.

त्यांचे दर्शन झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष वास्तु विशारद श्री सुभाष राजाराम दळी यांनी विशाखापट्टणम येथील साई भक्तांचा यथोचित आदर सत्कार केला. त्यानंतर सकाळी दहा वाजता वि. बा. खेर सभागृहात श्री दळी साहेबांचे शुभहस्ते होळीची पूजा करून होळी पेटवण्यात आली. सदर पूजेचे पौरोहित्य वे. शा. सं. श्री योगेश गुरुजी इनामदार वाळूजकर शास्त्री यांनी केले. दुपारी बारा वाजता नित्यनेमाप्रमाणे बाबांची महाआरती झाल्याच्या नंतर साई भक्तांना खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त ॲड.श्री अतुल दि. चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री ना के कुलकर्णी, सौ प्रज्ञा चौधरी, प्रताप आमले, बालाजी बेद्रे, प्रभाकर पाटील, मंदिर अधीक्षिका सौ छाया कुलकर्णी, सौ सुजाता डहाळे, सौ कलाबाई कांबळे, श्रीमती कमलबाई तेलंगे व मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते. अशी माहिती श्री साई स्मारक समितीचे प्रभाकर पाटील यांनी दिली.