ताज्या घडामोडी

कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे होतेय येत्या ३१मार्चला सेवानिवृत्त

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल विभागात 36 वर्ष 12 महिने 3दिवस (शासकीय सेवेत )काम करणारे राजेंद्र पांडुरंग पचारे हे उद्या शुक्रवार दि.31मार्चला वयाच्या 58 व्या वर्षि सेवानिवृत्त होत आहे.ते महसूल विभागात दि.28/4/1986रोजी तलाठी म्हणून सेवेत आले.
त्यांनी तलाठी या पदावर असताना राजूरा तहसिल कार्यालयातील अतिक्रमण विभागाचा कार्यभार स्विकारला.तदवतचं त्यांनी सास्ती,राजुरा,कोरपना, धिडशी, देवाडा, कवठाला, सावलहिरा या सह अतिदुर्गम जिवती तालुक्यातील 35 गावांत त्यांनी आपली सेवा दिली.त्या नंतर
राजुरा तालुक्यातील साझ्यावर त्यांनी तलाठी म्हणून कार्यभार सांभाळला होता .दि. 14/9/2014ला मंडळ अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. ते उद्या आपल्या वयाची 58 वर्षे पूर्ण करून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे.शासकीय सेवेत कार्यरत असताना मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांना
त्यांना तहसिलदार शेखर चन्ने भूषण गगराणी,श्याम तागडे, मिलिंद म्हैसेकर,प्रवीण देवरे शांतनू गोयल, राजा दयानिधी व उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांचे वेळोवेळी त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले . ये .यु.जुमडे,आनंद, पुद्दटवार,सुनील कोरडे, आरगुंडे, महिला तहसिलदार चौरगपते वालथरे,पुष्पा कुमरे,विपीन पाटील,प्रमोद कदम,हरिश्चंद्र गाडे, ,यांचे सहवासात त्यांनी शासनाची कामे केली . सेवानिवृत्त होत असताना ते तहसिलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शना खाली कोरपना मंडळ अधिकारी म्हणून काम बघत आहेत.शासनाने सोपविलेली कामे जबाबदारीने वेळीच हातावेगळी करायची असे त्यांनी आपले शेवट पर्यंत धोरण अवलंबिले होते.या शिवाय शेतकरी वर्ग व सर्व सामान्य जनतेची कामे वेळेच्या आत करुन त्यांनी त्यांना आज पावेतो योग्य न्याय दिला आहे.पचारे यांचे वडील एक प्रमाणिक व आदर्श शिक्षक होते.त्यांचे कामाचे अनुकरण त्यांनी आपल्या बाबतीत देखील करण्याचा नेहमीच आटोकाट प्रयत्न केला होता.
धिडशी या साझ्यावर काम करीत असताना वर्धा नदी पात्रातून WCl यांनी अवैध रेती उत्खनन करण्याचा सपाटा लावला होता.वेळीच आळा घालून त्यांनी 3884ब्रास,रेती त्यास(त्या गावात )नियमित रॉयल्टी प्राप्त करून दिली आहे आजही ती मिळत आहे.या व्यतिरीक्त पाटील कॅन्स्ट्रक्शन कंपनीचा मोठ्या प्रमाणात अवैध रवाडी व गिट्टीचा साठा जप्ती करून त्यांचेवर देखील त्यांनी दंडात्मक कारवाई केली होती.ही कारवाई पचारे यांनी तहसिलदार महेन्द्र वाकलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.
आदिवासींना वनपट्टे देण्या संबंधात योग्य अहवाल ,शेतकरी आत्महत्या बाबतीत तातडीने चौकशी अहवाल देणे ,कोरोना काळात दिलेली कामे त्यांनी वेळेवर केली.तसेच आदिवासी बहुल शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम देखील त्यांनी केले आहे.
सामाजिक हित जोपासत त्यांनी जनतेंशी व शेतकऱ्यांशी आज पर्यंत सलोख्याचे व प्रेमाचे संबंध ठेवले आहे.शासकीय सेवा करीत असतांनाच
त्यांनी संघटनेचे उपविभाग शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष,सचिव ही पदे सांभाळली आहे. जिल्हा उपाध्यक्ष हे ही पद त्यांनी भूषविले आहे. विदर्भ पटवारी संघटनेचे संघर्षि स्व.वि .म. उजवणे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनेची सर्व पदे विभूषित करून संघटनेची कामे नियमांने केली . शासकीय सेवेत असताना कला क्षेत्रात ही त्यांची आगळी वेगळी छाप राहिली आहे.त्यांनी अनेक लघू नाटीका शब्दांकित केल्या आहेत.पांधन एक घटना ही नाटीका फारच लोकप्रिय ठरली .राजेन्द्र पचारे हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कोल्हापूरचे (लेखक व अभिनेता म्हणून)सभासद आहे.आज पर्यंत त्यांचे वरिष्ठ अधिका-यांशी ,पटवारी व
कर्मचारी बांधवांसोबत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहे. आज ही मित्रपरिवारात त्यांची एक दिलदार मित्र म्हणून ओळख आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close