बेरोजगार तरुणांची सरकारकडे तब्बल कोट्यवधी रुपयांची उधारी-आ.प्रतिभा धानोरकर
प्रतिनिधिःरामचंद्र कामडी
राज्यातील जि.प. अंतर्गत 2019 व 2021 मध्ये पद भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली. सदरहु पद भरतीकरीता अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करुन परीक्षा शुल्क भरले. परंतू, वरील दोन्ही परीक्षा शासनाने रद्द केल्या. त्यामुळे बेरोजगार तरुणांची सरकारकडे तब्बल कोट्यवधी रुपयांची उधारी झाली. या अनेक बेरोजगारांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाने परत करावेत, अशी लोकहितकारी मागणी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.
३३ कोटी ३९ लाख ४५ हजार २५० रुपयें इतकी रक्कम राज्य सरकारकडे थकलेली आहे. जिल्हा परिषदांच्या भरतीमुळे बेरोजगारांची सरकारकडे कोट्यवधी रुपयांची उधारी थकली आहे. भरतीकरीता अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करुन परीक्षा शुल्क भरले. परंतू वरील दोन्ही परीक्षा शासनाने रद्द केल्या. परंतू अनेक बेरोजगारांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाने परत केले नाही. ते परत करण्याची मागणी आमदार धानोरकर यांनी केली आहे.