ताज्या घडामोडी

वैद्यकीय अधिकारी परभणी यांना प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांचे कडुन निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 01एप्रिल 2022 वार शुक्रवार रोजी मा. वैद्यकीय अधिकारी साहेब यांना दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांग याची तपासणी वेळेवर होत नसल्यामुळे तसेच जिल्हा रुग्णालय परभणी यांच्याकडून यापूर्वी दिलेल्या प्रमाणपत्रात जाणीवपूर्वक नावात बदल करणे जन्मतारीख बदल करणे व इतर बदल करणे यामुळे दिव्यांग व्यक्ती त्यांना मिळणाऱ्या लाभ, व सवलतीपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहत आहेत असे निवेदन देण्यात आले व तसेच डॉ. धुतमल सर यांनी असे आश्वासन दिले कि ज्या कर्मचार्‍याने व अधिकाऱ्याने दिव्यांग दिव्यांग लोकांना जाणून पूर्वक त्रास दिला आहे .त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
निवेदन देते वेळेस प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य पाथरी तालुका प्रमुख दिपक खुडे व श्याम भोकरे , तोफिक अन्सारी व इतर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close