ताज्या घडामोडी

जांभूळघाट येथील आदिवासी आश्रम शाळेत खावटी कीट वाटप कार्यक्रम

आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध .. आमदार बंटीभाऊ भांगडीया

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

सध्या कोरोना संकट असून या काळात प्रशासन किंवा सामाजिक संघटन च्या माध्यमातून मदतीचा ओघ आदिवासी लाभार्थ्यांना पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करीत आहे . आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात 12500 खावटी कीट वाटप करण्यात येत असून आदिवासी लाभार्थ्यांना दोन हजार रुपये अनुदान आपल्या खात्यात जमा होणार आहे आपल्या समस्या अडचणी असल्यास त्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या नाशिक उपप्रादेशिक कार्यालय चिमूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमूर यांच्या संयुक्त विधमानाने आयोजित अनुसूचित जमातीच्या कुटूंबाना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजने अंतर्गत अन्नधान्य कीट वाटप कार्यक्रम मध्ये आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर डॉ श्यामजी हटवादे ,भाजपचे जिल्हा सचिव राजु देवतळे, प्रकल्पअधिकारी केशव बावनकर , सहा प्रकल्प अधिकारी जुनघरे , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नामेवार, समीर राचलवार, जीप सदस्य मनोज ममिडवार पस सदस्य प्रदीप कामडी , भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे, कमलाकर लोणकर , संदीप पिसे सरपंच प्रफुल कोलते ,उपसरपंच राजु साठोने, राजू बानकर , विकी कोरेकर, अमित जुमडे,आकाश ढबाळे देवा मुंगले , मंगेश धाडसे, विलास कोराम, शैलेश पाटील, सरपंच दीक्षा पाटील आशा मेश्राम ,कल्याणी सातपुते ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रकल्पअधिकारी केशव बावनकर यांनी केले संचालन अमोल पिसे यांनी केले

दरम्यान तालुक्यातील मांगलगाव ,आंबेनेरी, खांबाडा, हरणी , खुटाळा ,लोहारा या गावात सुद्धा खावटी कीट वाटप करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close