खा. अशोक नेते यांनी गडचिरोली येथील फुटका मंदिर येथे मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता केली


प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
आज दिंनाक २१ जानेवारी २०२४ रोजी मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत गडचिरोली येथील नावाजलेले फुटका मंदिर,हनुमान मंदिर गडचिरोली येथे स्वच्छता मोहिम अभियान राबविण्यात आले.

या प्रसंगी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी मंदिर स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्याने आपण दिवाळी सारखा सण साजरा करावा. प्रत्येकांनी आपल्याला घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा.असा संदेश देत खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली येथील नावाजलेले फुटका मंदिरातील हनूमान मंदिर या ठिकाणी खासदार अशोक नेते यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदिर गाभाऱ्याची व परिसराची स्वच्छता केली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,भाजपा जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, युवा मोर्चा चे नेते आशिष कोडाप, भरत भारदवाज, कमलेश बिशवास,ईकबालभाई, संजय गणवेनवार,आसाराम तिवारी,
तसेच रामभक्त उपस्थित होते.