ताज्या घडामोडी

इमारत बांधकाम व विविध कामगार संघटने च्या वतीने सुरक्षा संच पेटी वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव शहरांमध्ये इमारत बांधकाम विविध कामगार संघटने च्या वतीने साबळे सभाग्रह बायपास रोड येथे सुरक्षा संच पेटी वाटप कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कॉम्रेड मुसद्दीक बाबा सर तालुका सचिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे होते यांच्या हस्ते बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच घेऊन उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉम्रेड सादेक पठाण इमारत बांधकाम विविध कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे होते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड शिवाजी कुरे जिल्हा उपाध्यक्षउपाध्यक्ष सिटू , कॉम्रेड सय्यद याकुब तालुका सचिव डी वाय एफ आय, सय्यद नूर नगरसेवक माजलगाव नगर परिषद यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व कामगारांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख चुन्नू यांनी केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड शेख अन्वर, कॉम्रेड शेख फयाज, शेख अलीम, शेख एजाज, शेख शकील, सय्यद आली यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आलेल्या सर्व मान्यवरांचे व परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे इमारत बांधकाम व विविध कामगार संघटनेच्या वतीने कॉम्रेड शेख अन्वर यांनी आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close