ताज्या घडामोडी

एड. योगेश अग्रवाल यांनी गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे बापू युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिली भेट

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

अखिल भारतीय बापू युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी सांगितले की जीवनामध्ये संघर्ष करा तेव्हाच आम्ही समोर जाऊन आणि कोणत्याही वेळी कोणतीही समस्या असून त्या समस्येला संघटनेच्या माध्यमातून सोडू शकतो.


अखिल भारतीय बापूजी युवा संघटन ही जो संघटना आहे एकमेव संघटना अशी आहे की समाजामध्ये किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच अन्य नागरिकांना जर काही समस्या निर्माण झाली आणि आपल्याला तेव्हा कोणी मदत करत नसेल तेव्हा ही संघटना धावून मदत करेल आणि संघटना ही एक कुटुंबासारखी आहे आणि संघटनेच्या माध्यमातून एक तरी लोकांना न्याय मिळतो याकरिता संघटनेचा उगम होतो.
अखिल भारतीय बापू युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष एडवोकेट योगेश अग्रवाल आज मुंडीपार येथे त्यांचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.
तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा स्वागत केले आणि अशावेळी उपस्थित अखिल भारतीय बापू युवा संघटनेचे मीडिया प्रमुख गोंदिया जिल्हा देवेंद्र दमाहे, आकाश नागपुरे, तसेच गुप्ता सर पांडुरंग जी मानकर, कटरे टायपिंग गोंदिया, राजेश भोयर लक्ष्मीकांत गाढवे अन्य समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close