जीवनातील सुख दुःख च्या वाटचालीचा अनुभव युक्त खजाना, परवणी म्हणजेच माझे स्व लिखित पुस्तक जीवन मर्म ब्रह्मा कुमारी – मीरा दीदी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने पावन झालेले गाव वडगांव (जन्म गाव) ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज च्या कृपाशीर्वादाने धारासुर मर्दिनीच्या ऐतिहासिक वार्षातून निर्माण झालेले जीवनातील एक अनमोल अनुभवयुक्त जीवनाकडे आनंदाने आनंददायी पाहण्याचा दृष्टिकोन देणारे ब्रह्मा कुमारी मीरा दीदी वाडकर लिखित जीवन मर्म पुस्तक प्रकाशन सोहळा, येत्या ८ जुलै २०२३ वार रविवार रोजी ब्रह्मा कुमारी शाखा धाराशिव ,फरिस्ता भवन हाउसिंग सोसायटीच्या जवळ आनंदनगर ,येथे सकाळी ९ वाजता होनार आहे.
उपस्थित मान्यवर सोलापूर उपक्षेत्र संचालिका आदरणीय, ब्रह्माकुमारी सोमप्रभा दीदी यांच्या शुभहस्ते तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये खासदार ,ओम राजे निंबाळकर, साहित्यिक शेषाद्री अण्णा डांगे, आमदार, कैलास पाटील व प्रमुख पाहुणे
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष – नेताजी पाटील ,
प्रमिला नलावडे
तसेच सामाजिक आणि अध्यात्मिक कार्यात नेहमीच हिरहिरिने भाग घेऊन सरस काम करत आपली एक वेगळी ओळख सोनपेठ तालुक्यात निर्माण करणाऱ्या मीरा दीदी वेगवेगळ्या अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. तसेच सुत्रशी बोलताना मीरा दीदी (ब्रह्मा कुमारी संचालिका सोनपेठ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था तालुका महिला अध्यक्ष) यांनी सांगितले की , साहित्यिक क्षेत्रात पुस्तक लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे . जीवन मर्म या पुस्तकाचा पहिला प्रवास आहे . असं म्हटलं जातं साहित्यिकाचं साहित्य म्हणजे
हे जणू काही भावना रूपाचे आपत्यच असते. तर अशा वेगवेगळ्या विषयांतर्गत शेतकरी, महिला सशक्तिकरण, नैतिक मूल्य, फॅशन, सोशल मीडिया , प्रामाणिकता, दृष्टिकोन, अशा एक नाही तर अनेक विषयावर आधारित १६० पानाचे मराठी पुस्तक आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला एक सकारात्मक ऊर्जा देऊन जीवन जगण्याचा मार्ग नक्कीच सापडला जाणार आहे. प्रकाशन सोहळा कार्यक्रम संपन्नतेसाठी ब्रह्मकुमारी मीरा दीदी, संतोष वाडकर, नारायण वाडकर ,सचिन पाटील विश्वास मोरे बी.के. कृष्णा हे सर्व सदस्य कार्यक्रम संपन्नतेसाठी मेहनत घेत आहेत.
जीवन मर्म या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी परभणी, सोनपेठ, बीड ,माजलगाव, बार्शी, धाराशिव, सोलापूर, तुळजापूर, अशा विविध तालुका, जिल्ह्यातून मित्रपरिवार व आप्तेष्टमंडळी वडगांव ग्रामस्थ गावकरी मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.