ताज्या घडामोडी

आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे सिकल सेल ॲनिमिया तपासणी शिबिर

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

31 मार्च 2022 रोजी आनंदनिकेतन महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागा द्वारे एकदिवसीय सिकल सेल ॲनिमिया तपासणी चे मोफत चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.ज्यात आनंदवन येथील सीता रतन हॉस्पिटल मधील कपिलदेव कदम सर (Lab Teach ) तुषार देसी (MPW), शैलेश सहारे (Desig lab Scientific officer)व त्यांच्या टीम ने महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 245 तपासण्या केल्या. प्राथमिक तपासणी मध्ये 20 विद्यार्थी Positive आढळले असून , सदर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने हे खात्री करण्यासाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आलेले आहे. सदर शिबिरा मध्ये Positive आढळलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन ही करण्यात आले.समाजात या आजाराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन ही करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुधाकर पेटकर ह्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ.मृणाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ.अरविंद सवाने, प्रा. रामदास कामडी, प्रा.संयोगिता वर्मा, प्रा. तिलक ढोबळे, प्रा.हेमंत परचाके यांच्या मार्गदर्शनात हे शिबीर यशस्वी रित्या पार पडले.प्रयोगशाळा सहाय्यक भूषण सूर्यवंशी व अमलपुरीवार यांचे ही सहाय्य ह्या शिबिराला लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close