2ऑक्टोंबर पासून बोपेसर ग्रामपंचायत समोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पदाधिकारी करणार आमरण उपोषण
प्रतिनिधिःसंजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तालुक्यातील ग्राम बोपेसर येथील ग्रामपंचायत ने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व समाज मंदिराच्या जागेवर काटेरी कुंपण करुन अतिक्रमण केलेल्याने ग्राम पंचायती ने हे अतिक्रमण न काढल्यामुळे 2ऑक्टोंबर पासून ग्राम पंचायत बोपेसर समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली आहे .
प्राप्त माहितीनुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बोपेसरच्या वतीने जिल्हाधिकारी गोंदिया यांना देण्यात आले ल्या निवेदना प्रमाणे बोपेसर येथील शासकीय गट क्रं.63 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व समाज मंदिरं असून समाज मंदिराची दुरूस्ती ग्राम पंचायत कडे असून वहिवाट डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ची जागा असून.शेजारील जागा गट क्रं 61 वर वासुदेव भेलावे यांचे घर असून ते सोडून त्यांनी गट क्रं 63 वरील रिकामे जागेवर काटेरी कुंपण केले असून हे काटेरी कुंपण काढावे म्हणुन स्मारक समिती तर्फे ग्रामपंचायती ला पत्र दिल्यावरून ग्रामपंचायत तर्फे हे अतिक्रमण काढण्याचा ठराव पारीत केला असला .तरि अजून पर्यंत अतिक्रमण न काढण्यात आल्याने 2 ऑक्टोंबर पासून ग्राम पंचायत बोपेसर समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया यांना देण्यात आले असले तरी अतिक्रमण काढण्यात न आल्याने.डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बोपेसर तर्फे ग्रामपंचायत बोपेसर समोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकार्यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.