चिमुरचे ठाणेदार शिंदे सर यांचे नेरी येथील निवडणुकीतील उमेदवारांना मार्गदर्शन

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
नेरी ग्रामपंचायत निवडणुक साठी ऊभे असलेले उमेदवार यांना नेरी पोलीस चौकी येथे चिमुर पोलिस स्टेशन चे ठाणेदार मा . शिंदे सर यांनी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले .
शिंदे सर मार्गदर्शनात म्हणाले की , निवडणुक ही भारतीय संविधानानुसार लोकशाहीची अविभाज्य मुलभुत प्रक्रिया आहे. या लोकशाही सोहळ्यास सर्वांनी उत्स्फुर्तपणे पार पाडावे. गाव म्हटल की आपआपसात काही ना काही छोटे मोठे मतभेद असतातच. पण लोकशाहीचे मुल्य जपुन कोणतेही हेवेदावे वा वैरमनस्य न ठेवता योग्य पद्धतीने निवडणुक प्रचार व मतदान प्रक्रिया पार पाडावी.
आम्ही पोलीस प्रशासनातर्फे पुर्ण खबरदारी घेऊन , सोबत पेट्रोलिंग राबवुन निवडणुक सुरळीत व्हावी यासाठी दक्ष आहोत. गावकरी व उमेदवारांकडूनही योग्य वर्तणुक व सहयोगाची आम्ही अपेक्षा करतो. कुठेही आक्षेपार्ह बेकायदेशीर कृती आढळल्यास त्यांच्यावर कारवाही करण्यात येईल. उपस्थित उमेदवारांनी आपआपल्या शंका व प्रश्न शिंदे सरांना विचारुण त्यांचे निरसण करुन घेतले.
मार्गदर्शणपर कार्यक्रमाचे आयोजक पी.एस.आय. मा. गायकवाड सर होते. मेजर मोहुर्ले सर ,पो. शि. विशाल , पो.शि. सचिन ,पो.शि. साठे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालण व आभार प्रदर्शन नाईक शिपाई सुर्यवंशी यांनी केले.