ताज्या घडामोडी

सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या संयोजिकापदी रंज्जू मोडक यांची नियुक्ती तर सहसंयोजिकापदी नलिनी आडपवार यांची निवड

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

कला, साहित्य ,सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील कलावंत व गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणारा व त्यांच्या कलागुणांना सदैव चालना देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूर निवासी रंज्जू दिलीप मोडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे .तर याच गृपच्या सहसंयोजिकापदी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील रहिवाशी नलिनी आडपवार यांची आज निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या जेष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धोटे तदवतचं भद्रावती येथील व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापिका कु.किरण साळवी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली” सहज सुचलं “असे नांव धारण करणाऱा सहज सुचलं हा एक व्हाॅट्सअप गृप आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या ह्या दोघींही सामाजिक बांधिलकी जपणा-या महिला कार्यकर्त्या आहे.आज नव्याने सन २००४ या वर्षा करीता सहज सुचलंच्या सर्व गृपची कार्यकारणी घोषित करण्यात आली.त्यात -सहज सुचलं हक्काचे व्यासपीठ संयोजिका प्रांजल रायपूरे अकोला सहसंयोजिका रिना तेलंग चंद्रपूर, आपलं सहज सुचलं संयोजिका पोर्णिमा कीर्तीवार मूल चिरोली, सहसंयोजिका सोनिया गेडाम चंद्रपूर, आवाज सहज सुचलंचा संयोजिका सोनाली इटनकर चंद्रपूर सहसंयोजिका शैला चिमड्यालवार सावली(चंद्रपूर) सहज सुचलं रांगोळी कला संयोजिका दिपाली जाधव मुंबई, चैताली आतराम शहापूर नाशिक, सहज सुचलं सखी मंच -संयोजिका अदिती वानखडे अकोला सहसंयोजिका प्राजक्ता पाठे अकोला, मेकअप ऑर्टीस्ट गृप संयोजिका कल्याणी सरोदे नागपूर सहसंयोजिका सोनाली गोडाने नागपूर, सहज सुचलं काव्यकुंज संयोजिका सरोज हिवरे राजूरा, सहसंयोजिका वैशाली राऊत नागपूर, सहज सुचलं आरोग्य धनसंपदा संयोजिका कल्पना बनकर मुंबई, सहसंयोजिका प्रतिभा पोहनकर चंद्रपूर ,संपादकीय सहज सुचलं गृप मध्ये भद्रावतीच्या रजनी रणदिवे, नागपूरच्या जेष्ठ सामाजिक महिला कार्यकर्त्या डॉ.स्मिता मेहेत्रे ,चंद्रपूरच्या मंथना नन्नावरे, अपर्णा चिडे, सुरेखा चिडे , यांचा समावेश आहे.
अनेकांनी केले त्यांचे नियुक्तींतीचे अभिनंदन ,दरम्यान सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका पदी रंज्जू मोडक व सहसंयोजिका पदी नलिनी आडपवार यांची निवड झाल्याबद्दल मराठी फिल्म अभिनेत्री मनिषा बि-हाडे, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी,महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य जेष्ठ मार्गदर्शिका उपराजधानी निवासी मायाताई कोसरे , चंद्रपूर प्रख्यात साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, भद्रावतीच्या व्हॅर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, चंद्रपूर -गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्याच्या सहज सुचलं गृपच्या मार्गदर्शिका वर्षा कोंगरे, जागतिक पुरस्कार प्राप्त पाचवडच्या प्रख्यात कवयित्री कु. अर्चना सुतार , बारामतीच्या अश्विनी दीक्षित , विजया तत्वादी, स्मिता बांडगे, विजया भांगे, नंदिनी लाहोळे, पायल दुपारे, रश्मी पचारे, श्रूतिका नन्नावरे, भावना मोडक, सीमा पाटील, श्रुति उरणकर, वर्षा आत्राम, दीक्षा तेली, संगिता पाटील, रेखा कुमरे, व अन्य सदस्यगणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .येत्या १जानेवारीला सहज सुचलं गृप दहाव्या वर्षात थाटात पदार्पण करीत असल्याचे मायाताई कोसरे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन आज सकाळी बोलताना सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close