ताज्या घडामोडी

डॉ.सतीश वारजूकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

जिल्हा परिषद शंकरपूर व पंचायत समिती सदस्य असोसिएशनतर्फे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विरोधी पक्ष गटनेते डॉ . सतीश वारजूकर यांना महाराष्ट्रातून टॉप १० जिल्हा परिषद सदस्यांमध्ये उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य म्हणून ७ मार्च २०२२ ला पुणे येथे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . याबद्दल ११ मार्च रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात पंचायत समिती सदस्य अजहर शेख यांच्या हस्ते डॉ . वारजूकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी पंचायत समिती सभापती लता पिसे , पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक , माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य शांताराम सेलवटकर , पंचायत समिती सदस्य प्रदीप कामडी , पुंडलिक मत्ते , भावना बावनकर , नर्मदा रामटेके , गिता कारमेंगे , महिला व बाल कल्याण अधिकारी पूनम गेडाम , कृषी अधिकारी सहारे , विस्तार अधिकारी गुंतीवार व पंचायत समितीमधील कर्मचारीवृंद उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close