ताज्या घडामोडी

‌सरोज अंदनकर यांच्या आरती संग्रहाविषयी प्रांजल रायपूरे यांचे मनोगत

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

नागपूरच्या सरोज माईचा आरती संग्रह वाचला जीवनाचे पारणे फिटल्या सारखे वाटले अंतरंगातील गाभाऱ्यात वसलेल्या त्या ईश्वराला आपुलकीची हाकच! प्रत्येक शब्द “अमृता परीस” एक सारखी शब्दांची गुंफण करणे सोपे नाही साहित्यात नव नवीन निर्मिती म्हणजेच खूप मेहनत जिद्दीने काहीतरी करण्याची तळमळ उदयास येते .माझे फक्त शब्दातील भाव दर्शवलेले आहे स्वतः मनातील आर्तता स्वतः अनुभवली ती आपल्यापर्यंत पोहोचवली त्याचा आस्वाद आम्ही घेतला खरोखरच उल्लेखनीय आहे. अश्या शब्दात अकोला येथील सुपरिचित साहित्यिक प्रांजल रायपुरे यांनी सरोज अंदनकर यांच्या आरती संग्रहाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
माणसाला जीवनामध्ये बरेच चढ-उतार येतात आयुष्य जगताना आयुष्य खूप गोष्टी सांगून शिकून जातात पण असे सहवासी ,अशी मैत्रीण असा गुरु आपल्या वाटेस येणे म्हणजेच आयुष्याचं” गुलकंद” झाल्याशिवाय राहत नाही.

गोडवा प्रत्येकात असतो तो निभवण्याचा सांगण्याचा मार्गदर्शक गुरु प्रत्येकाच्या नशिबात नसते असंच आगळंवेगळं व्यक्तिमत्व माईंच आहे. शब्दां मध्ये परखडता असली तरी स्पष्ट वक्ता आहे याच स्पष्टीकरण याचं सरळ स्वरूप खरं शब्दाला अस्तित्व प्रदान साध्या सोप्या मनाला तसेच आवडेल असा भाव आपणही त्या कवितांना लावू शकतो असा आरती संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आपल्या भावना ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळ शुद्ध भाव समर्पणाची प्रस्थापित करण्यासाठी केवळ आरती संग्रह सरोज माईने निर्माण केला सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा मला सुद्धा आरती संग्रहातून बराचसा अनुभव आला, आरती संग्रह प्रत्येक सणांचा मार्गदर्शक ठरला ज्या सणांची आरती माहीत नाही त्या सणांची आरती मी म्हणू शकते आणि सहजतेने म्हणता येईल अशी आहे. दुजा भाव कुठेच जाणवत नाही साहित्यिक कलांमध्ये श्रेष्ठ पदावर असल्या तरीही त्यांच्या शब्दांमध्ये लय बद्धता असते हे प्रत्येकात नसते माईचं जेवढ कौतुक करावं तेवढं कमीच काव्य असो व कोणतेही क्षेत्र तिथे व्यक्तिमत्व सरळतेने गाजवले आहे. स्पष्टतेने नमूद केले आहे. एवढे सर्व साध्य करणे सोपे नाही खूप काही विचारांचं मेहनतीचं आत्मविश्वासाचा एकत्रीकरण करावे लागते.

“जिथे भाव विश्व आहे टाळ्यांचा गजर आहे” आरतीचे शब्द मुखातून गायनातून शुद्ध अश्रुधारा वाहू लागतात असा आरती संग्रह हृदयाच्या मखमली पेटीत सजणारा ठरतो.असे रायपुरे यांनी शेवटी म्हटले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close