वासनविहरा तलावाला पडले मोठे भगदाड ,लंघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमूर तालुक्यातील वडसी गोदेंडा येथुन जवळच असलेल्या रिटी वासनविहरा तलावाला सतत येत असलेल्या पावसामुळे मोठे भगदाड पडल्याने या परीसरातील शेतकरी वर्गाला शेतीला पाणी कसे करावे असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी वर्गानी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चिमूर यांना निवेदन दिले आहे.
चिमूर तालुक्यातील रिटी असलेल्या वाशिनविहीरा परीसरात मोठ्या प्रमाणात शेती असुन जंगलाला लागुन विशिनविहरा तलाव आहे.या तलावात पाणी साठा मोठ्या प्रमाणात साचून राहत असतो .हा पाणी साठा या परीसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला व जंगलातील प्राण्यांच्या कामी येत असतो . काही वर्षांपूर्वी या तलावाचे काम झाले परंतु ते काम अतिशय निष्कुष्ट दरज्याचे झाल्याने यावर्षी संततधार पावसामुळे तलावाला मोठे भगदाळ पडले त्यामुळे तलावात शेतीला पाणी करण्यासाठी पाणी साठा राहणार नाही .करीता या परीसरातील ३३ शेतकऱ्यांनी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चिमूर यांना निवेदन दिले आहे.लवकर तलावाचे भगदाड पडले आहे या कामाची दुरुस्ती करून देण्याची मागणी शेतकरी गोविंदा खाटे, उध्दव जांभुळे, रुपचंद आत्राम, मनोहर जांभूळे, नितेश जांभुळे,नवलू मेश्राम, ईश्र्वर रामटेके,लक्ष्मण खाटे, विनोद श्रिरामे,आनदराव चौधरी, घनश्याम दडमल,श्रावण जिवतोडे केली आहे.