ताज्या घडामोडी
स्व.नितीन महाविद्यालयात प्लॅस्टिक बंदी जनजागरण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी-स्व.नितीन महाविद्यालयात रासेयो विभागाच्या वतीने प्लॅस्टिक बंदी जनजागरण मोहीम राबवुन महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आले या वेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे टी.एफ यांनी मार्गदर्शन केले. प्लॅस्टिक बंदी काळाची गरज आहे नैसर्गिक साधन संपत्ती अबाधित ठेवायची असेल तर नुसतेच नियम काढुन भागणार नाही तरूणांनी हिरेरीने सहभाग होणे गरजेचे आहे.या वेळी परिसरातील चार किलो प्लॅस्टिक गोळा करून योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आले.या वेळी उपप्राचार्य, डॉ.सामाले एस.टी ,सह कार्यक्रमाधिकारी डॉ.मोरे जी.जे, डॉ.भारत निर्वळ ,डॉ.बोचरे जे.एम,डॉ.साहेब राठोड, डॉ.शीतल गायकवाड, डॉ.ठोंबरे एम.डी प्रा. गायके,डॉ.मुसळे हनुमान, डॉ.ईंजेगावकर, महादु नखाते आदी कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.