गोंदेडा येथील तंमुस ने लावुन दिले प्रेमी युगलांचे प्रेमविवाह
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नेरी वरून जवळ असलेल्या गोंदेडा येथे दि 18जाने ला महात्मा गांधी तंटामुक्त समिती गोंदेडा च्या वतीने एका प्रेमी युगलांचे विवाह तपोभूमी च्या आवारात लावून देण्यात आले
केवाडा येथील सौरभ दिवाकर पोईनकर ता चिमूर आणि आचल सुरेश सोनुने भटाळा ता वरोरा यांचे मागील 2 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते सौरभ हा भटाळा येथे मामा कडे शिक्षण घेत होता भटाला येथे दोघांचीभेट होऊन ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि भेटीगाठी वाढल्या यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या व ह्या चर्चा घराच्या पर्यंत पोहचल्या तेव्हा यांच्या प्रेमाला घरच्या मंडळींनी विरोध करून त्यांना समज दिली परंतु दोन्ही ही प्रेमवीर समजण्यापालिकडे प्रेमात आकंठ बुडाले होते त्यांनी घरच्यांना न जुमानता लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही सरळ गोंदेडा गाठून येथील तमुस कडे विवाह करण्यासाठी रीतसर अर्ज केला तेव्हा तंटा मुक्त समितीने संपूर्ण कागदपत्राची योग्य चौकशी करून त्यांच्या वयाची तपासणी करुन सर्व तमुस सदस्याच्या संमतीने एकमताने लग्न लावून देण्याचे ठरविण्यात आले व रीतिरिवाजानुसार दोघांचेही विवाह सर्व तमुस समिती व गावकऱ्यांच्या उपस्थितीत लावून देण्यात आले लग्नची सर्व विधी ह भ प सुधाकर चौधरी महाराज राष्ट्रीय कीर्तनकार यांच्या हस्ते करण्यात आली
या विवाह प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शालीक वाढई मधुकर वाढई विठ्ठल वाढई चनफने महाराज वसंता घोडाम गंगाधर चौधरी शंकर बावणे वामन बोरकर सर्व तमुस चे सदस्य पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.