जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे जनजातीय गौरव दिवस
प्रतिनिधीःराहुल गहुकर
चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.15 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त जनजातीय गौरव दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला आयु. वामनराव गजभिये यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले .
आयु. स्वप्नील मसराम तसेच सनय बांबोडे यांनी “जननायक भगवान बिरसा मुंडा” यांचे “क्रांती कार्य” या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून अभिवादन केले. बिरसा मुंडा यांनी १९०० मध्ये इंग्रजांविरूद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हटले ‘आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरुद्ध विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्वीकारत नाही. इंग्रज आमच्याविरुद्ध उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटिश सरकारने आपली सेना बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविली. बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले. त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने बिरसा मुंडा यास अटक केली. त्यांच्यासोबत ४६० आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. बिरसा यांनी 1895 मध्ये सामाजिक सुधारणेचे काम हाती घेतले. त्यांनी सर्व आदिवासींना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जंगल, जमीन आणि मालमत्तेच्या हक्कासाठी लढा द्या, जे आमचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. अशा शब्दात मान्यवरांनी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
या प्रसंगी आयु. गंगाधरजी गजभिये, भीमाबाई गजभिये, आशिक रामटेके, जितेंद्र मेश्राम, प्रदीप मेश्राम, वैभव गजभिये, प्रफुल वरखेडे, पंकज रामटेके, विकास वरखेडे, आदी. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन सचिन गजभिये यांनी केले.