श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात संस्था वर्धापन दिन संपन्न
संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, कोषाध्यक्ष सत्यनारायण लोहिया यांच्या हस्ते संस्था ध्वजारोहण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात सकाळी ७:४० वाजता संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, कोषाध्यक्ष सत्यनारायण लोहिया यांच्या हस्ते संस्था ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात सांघिक पद्य, दीप प्रज्ज्वलन करुन तसेच भारतमाता व माता सरस्वती पूजन करुन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कोषाध्यक्ष सत्यनारायण लोहिया तर प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य हे होते तर व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड, प्रेमकिशोर मानधने, अॅड विश्वास जोशी, तेजस महाजन, जगदीश साखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक विभागातील, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत, महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप सत्यनारायण लोहिया यांनी केले तर प्रास्ताविक प्र मुख्याध्यापक विजेंद्र चौधरी, आभार प्राचार्य डॉ महेश देशमुख तर सुत्रसंचालन प्रा डॉ रमेश गटकळ यांनी केले, यावेळी संस्था सभासद, पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.