मनोज आव्हाड हत्ये प्रकरणी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एक दिवसीय धरणे प्रदर्शन व प्रशासनास निवेदन

बहुजन क्रांती मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा व लहुजी क्रांती मोर्चा यांच्या वतीने राज्यभर निषेध नोंदवून निवेदन दिले.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी: बहुजन क्रांती मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा व लहुजी क्रांती मोर्चा यांच्या वतीने मनोज आव्हाड हत्येप्रकरणी दिनांक २५ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील ३६जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयवर एकाच वेळी एक दिवसीय धरणे प्रदर्शन व निषेध नोंदवत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पाथरी येथे देखील पाथरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की औरंगाबाद येथील मनोज आव्हाड या युवकाची हात व पाय बांधून जबर मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यात आणखी कलमाची वाढ करून या प्रकरणाचा तपास तत्काळ हा खटला एसआयटी कडे देण्यात यावा. तसेच खटला तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आव्हाड परिवार परिवारास आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. मनोज आव्हाड यांच्या पत्नीस शासकीय सेवेत सहभागी कायमस्वरूपी करून घ्यावे. अशा प्रकारे विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.यावेळ विविध सामाजिक संघटना मानवी हक्क अभियान व पुरोगामी विचार मंच यांनी देखील निवेदन देले. यावेळी शिवाजी पारखे,हर्षवर्धन नाथभजन,पांडुरंग दादा पवार,संजय सोनकांबळे, एम.ए.कांबळे,माधव कदमपाटील,उत्तम झिंजुर्डे ,संतोष जोगदंड,बंडू कांबळे,मुजीब आलम,नितीन कांबळे,दिलीप हिवाळे, गोदावरीताई खिलारे,मुक्ताबाई पवार,पांडुरंग चव्हाण,महादेव चव्हाण,राजेश गोरे,सतीश गवारे,निलेश कांबळे,गोविंद कांबळे,समाधान गवारे,आकाश भगत, सचिन कांबळे,अजय कांबळे,नरेंद्र कांबळे,गोपाळ खंदारे,कृष्णा हिवाळे, सुनिल कांबळे,सचिन झिंजुर्डे,सुशील कांबळे,शंकर साळवे ई.पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.