ताज्या घडामोडी

शिक्षणाच्या माध्यमातून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा- रविंद्र तिरानीक

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोरा चे वतीने आनंदवन येथील आनंद माध्यमिक विद्यालयात शालेय वस्तूंच्या किटचे वितरण.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

श्रद्धेय बाबा आमटे यांनी आनंदवन चे नाव भारतातच नाही तर संपूर्ण जगात नावलौकिक केले .त्यांनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून गोरगरीब, आदिवासी मुलांना शिक्षणाची दारे उघडली. महाविद्यालय ,कृषी महाविद्यालय, अंध- मूकबधिर विद्यालय ,प्राथमिक शाळा , माध्यमिक विद्यालय अशा अनेक संस्था उभ्या केल्या. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी व उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्कप्रमुख रविंद्र तिराणिक यांनी आनंद माध्यमिक विद्यालयात अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोरा च्या वतीनेआयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रद्धेय कर्मयोगी बाबा आमटे व स्वर्गीय साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .अध्यक्षस्थानी रवींद्र तीराणिक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशी ,श्रीपाद भाकरे , अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष सादिक थैम ,लखन केशवानी पत्रकार तथा पोलीस मित्र,परमानंद तीरानिक कलाशिक्षक तथा पत्रकार, ग्यानिवंत गेडाम पत्रकार ,धर्मेंद्र शेरकुरे पत्रकार ,आनंद माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे ( टोंगे ),सहाय्यक शिक्षक तथा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोहपरे हे उपस्थित होते, सादिक थैम म्हणाले यापुढेही ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोरा च्या माध्यमातून असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.आनंद विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शालेय वस्तूंच्या किटचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकेतून आपले मनोगत व्यक्त करताना प्रदीप कोहपरे म्हणाले की आनंदवनात माध्यमिक विद्यालय नव्हते तेव्हा संस्थेने सन 2018 मध्ये वर्ग 9 व 10 सुरू केला तेव्हा फक्त पंधरा विद्यार्थी होते आज याच दोन वर्गामध्ये 115 विद्यार्थी शिक्षण घेत आहे याचे कारण मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण व त्यांचा बौद्धिक ,सामाजिक ,सांस्कृतिक व खेळ यावर शाळेतील शिक्षकांनी घेतलेले परिश्रम याचे फलित असल्याचे ते म्हणाले आणि पुढेही या शाळेचे विद्यार्थी घडत राहणार असे प्रदीप कोहपरे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप कोहपरे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक आशिष येटे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षिका स्मिता काळे, निशा येरणे ,मयूर गोवारदिपे ,लिपिक प्रकाश नाकाडे यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close