ताज्या घडामोडी
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा मोटेगावं च्या वतीने अपघातामध्ये मध्ये मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना दोन लाखाची मदत
ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव
मोटेगाव ता चिमूर येथील रहवासी व बॅकेचे खातेदार श्री. गोकुलदास हरिराम मेश्राम यांचा रोड अपघातामध्ये मृत्यु झाला होता. मोटेगावं येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखे अंतर्गत त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) सुरु केली होती, त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांच्या पत्नी सारिकाताई गोकुलदास मेश्राम यांना दोन लाखाची (२०००००) मदत विदर्भ कोंकण ग्रामीण बँकतर्फे करण्यात आली. याप्रंसगी शाखेचे व्यवस्थपक श्री. कोकोडे साहेब यांनी सर्व ग्राहकांनी जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आव्हान केले. याप्रंसगी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे सूर्यवंशी सर, निलेश मसराम , सौ. शालिनीताई माहुरे.यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.