ताज्या घडामोडी

वनरक्षकासाठी भाजपा कार्यकर्ते एकमेकाच्या आमने-सामने

आमदार-खासदार पत्र देऊन झाले मोकळे.

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नागभीड व सिंदेवाही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या काजळसर- मोठेगाव बीटा गेल्या तीन वर्षापासून श्रीकृष्ण नागरे हे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कार्यकाळात त्यांनी अनेक योजनांमध्ये अपहार, नोकरीच्या कामात हयगय आणि असभ्य वर्तन करीत असल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी यासाठी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्य वनरक्षकांकडे निवेदन दिले आहे, तसेच या क्षेत्रातील आमदार माननीय बंटीभाऊ भांगडीया व माननीय खासदार अशोकजी नेते यांनीसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे.
परंतु भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी यांच्या विरोधात जाऊन श्रीकृष्ण नागरे यांची बदली रद्द होण्यासाठी मुख्य वनरक्षक यांना निवेदन दिल्यामुळे भाजपाचे दोन्ही कार्यकर्ते एकमेकाच्या आमने-सामने येऊन या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे, परंतु जनता मात्र संभ्रमात पडलेली आहे. वनरक्षक श्रीकृष्ण नागरे यांची बदली होणार किंवा बदली होणार नाही असा संभ्रम भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेत निर्माण केलेला आहे. याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पडू शकतो तेव्हा भाजपाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी याकडे जातीने लक्ष द्यावे,तसेच माननीय आमदार व माननीय खासदारांनी याकडे जातीने लक्ष देऊन जनतेतील संभ्रम दूर करावा. एका कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी एवढा अट्टाहास होणे योग्य नाही. तसेच या प्रकरणात योग्य ती चौकशी करून योग्य न्याय द्यावा अशी जनतेमध्ये मागणी जोर धरू लागलेली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close