ताज्या घडामोडी

गंगातीरी उत्पादक कंपनी विक्री केंद्राचे भिसी येथे उदघाटन सोहळा

उप संपादक:विशाल इन्दोरकर


राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर जि.चंद्रपूर दवारा संचालित गंगातीरी दुग्ध शेतकरी उत्पादन कंपनी भिसी या कंपनीच्या कार्यालय व विक्री केंद्राचे उदघाटन दिनांक 1मार्च 2024 ला विठ्ठल रुख्मिणी देवस्थान सभागृह भिसी ता.चिमूर जि.चंद्रपूर येथे संपन्न झाला. तसेच गंगातीरी प्रोड्यूसर कंपनी मार्फत शुद्ध व भेसळमुक्त दुध -तूप व जनावरांना पशु खाद्य विक्री केंद्र सुरु करण्यात आले.कंपनीचे व विक्री केंद्राचे

उदघाटन मा. तृणाल फुलझेले सहा. महाप्रबंधक नाबार्ड चंद्रपूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ. मंगेश काळे उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन चंद्रपूर,मुख्य अतिथी मा.राणे साहेब क्षेत्रीय प्रबंधक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंद्रपूर,मा. डॉ.हिरुटकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चंद्रपूर,मान.पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी,श्री.प्रणय मेश्राम शाखा प्रबंधक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चिमूर,कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मोरेश्वरजी झाडे, मनोज गेडाम,अविनाश डोये, इत्यादी मान्यवर उपस्थित राहून या प्रसंगी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनोज गेडाम,तर संचालन रितेश बावणकर,आभार प्रदर्शन हर्षाली बोरकर यांनी केले. याप्रसंगी रितेश बावनकर,अतुल लांजेवार,गुरुदेव ढोरे सौ.हर्षाली बोरकर, सुषमा रणदिये, गजानन नन्नावरे,विजय बोरकर, विजय निकुरे,सागर चौधरी, राहुल वाघधरे, निशांत बन्सोड ceo fpo कंपनी,किशोर पोईनकर निषाद नन्नावरे,कंपनीचे संचालक व शेअरधारक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close