ताज्या घडामोडी

बाभळगाव मंडळात रब्बी ज्वारी सह पिण्याच्या पाण्याची गंभिर परिस्थिती;चारी ला पाणी सोडण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी बाभळगाव मंडळात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेली या मंडळाला शासनाने दुष्काळी मंडळ म्हणून जाहिर केलेले आहे. नोव्हेंबर महिण्यात शेवटी जायकवाडीचे पाणी आवर्तन मिळाल्याने डिसेंबर च्या पहिल्या, दुस-या आठवड्यात रब्बी पेरणी झाली खरी परंतु आता ज्वारी आणि अन्य पिके करपत चालली असून पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होत असल्याने जायकवाडीच्या पाथरी उपविभाग क्र. ६ च्या चारी क्र बी ५९ मधून त्वरीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी आणि सामान्य जनतेतून होत आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेती पिकांना फटका बसत आला आहे. यात कधी अतिवृष्टी तर कधी आवकाळी पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ या वर्षी कोरड्या दुष्ळाचा सामना बाभळगाव मंडळातील अनेक गावे करत आहेत. शेतातील ज्वारीच्या पिकाला जायकवाडीचे पाणी मिळाले तर किमान जनावरांना चारा तरी मिळेल कारण या पाण्यावर ज्वारीच्या कनसात दाने तर भरणार नाहीत परंतूू जनावरांच्या चा-याचा प्रश्न काही अंशी सुटून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटू शकतो असे शेतकरी सांगत आहेत. बी ५९ या चारी वर जवळपास विस,बाविस गावांना पाणी मिळते एवढ्या मोठ्या संखेने गावे असतांना अधिकारी मात्र तारीख पे तारीख देत असल्याने शेतक-यां मधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. जायकवाडी कालवा सल्लागार समितीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री ना. संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षते खाली सात जानेवारी रोजी संपन्न झाली होती. त्यात जायवाडीच्या पाण्याचा आढावा घेऊन फेब्रुवारी, एप्रिल, आणि मे महिण्यात रब्बी साठी कालव्या व्दारे पाणी पाळी देण्याचे निश्चित झाल्याचे या समितीचे सदस्य तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन माजलगावचे माजी आ आर टी देशमुख यांनी सांगितले होते. त्याच बरोबर गोदावरी नदी वरील सर्व उच्च पातळी बंधा-यांना ही पाणी सोडले जाणार असल्याचे या बैठकीत ठरले होते. परवा कालवा सल्लागार समितीचे सदस्य माजी मंत्री आ राजेश टोपे यांनी एक व्हिडीओ तयार करत या आवर्तनाच्या नियोजना विषयी माहिती देत सोशल मिडियात व्हारल केला आहे. त्या मुळे हे आवर्तन मिळणार असा विश्वास शेतकरी सामान्य माणसात निर्माण झाला असला तरी बी ५९ चारी वर पाथरी तालुक्याचे मोठे क्षेत्र ओलिता खाली येत असल्याने या भागात किमान विस,पंचविस दिवस चारी ला पाणी ठेवावे लागते. आणि पाणी आवर्तन २६ फेब्रुवारी पर्यंतच असल्याचे सांगितले जात असल्याने एवढे क्षेत्र कमी दिवसात कसे ओलित होईल असा प्रश्न शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. त्या मुळे बी ५९ या चारीला त्वरीत पाणी नाही सोडल्यास या भागातील शेतकरी रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करावे लागेल असे उघडपणे बोलत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close