ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासावा – अनिलभाऊ नखाते

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली व भविष्यातही विज्ञानामुळे अनेक अश्यक गोष्टी शक्य होणार आहेत. विज्ञान हे मानवाच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासावा असे आवाहन वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिलभाऊ नखाते यांनी केले.
दिनांक 30 ऑगस्ट 2022 मंगळवार रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित, शांताबाई नखाते विद्यालय पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी व शांताबाई नखाते विद्यालय पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.परभणी चे मा. सभापती सुभाषआबा कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरीचे मा.संचालक नारायणराव आढाव, देवनांद्रा ग्रामपंचायत चे मा.सरपंच नितीन शिंदे, अंधापुरी येथील बिटेदादा, बालासाहेब मुजमुले शाळेचे प्राचार्य डहाळे के.एन., मुख्याध्यापक यादव एन. ई., परीक्षक म्हणून प्रा. गीराम एस. डी., प्रा. कांबळे व्ही.बी., उपस्थित होते. या नाट्य उत्सवामध्ये पाथरी तालुक्यातील दहा शाळेच्या संघांनी सहभाग नोंदवला. सर्व कलाकारांनी उत्स्फूर्तपणे कला सादर करून अंधश्रद्धा निर्मूलन, लसीकरण व विज्ञानवादी दृष्टिकोन याची आपल्या नाटिके मधून जनजागृती केली. वैज्ञानिक रुदर्फोर्ड व डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या स्पर्धमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पाथरी यांनी प्रथम, नेताजी सुभाष विद्यालय पाथरी यांनी द्वितीय, शांताबाई नखाते विद्यालय पाथरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कलाकारांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी पारितोषिक पटकवनाऱ्या संघाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डहाळे के.एन.यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण एस. डी. यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी, प्रेक्षक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close