उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) पदावर रुजू झालेल्या मीना साळुंखे यांचा संगणक परिचालक संघटना जिल्हा चंद्रपूर यांचे कडून सत्कार
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत विभाग ) पदावर रुजू झालेल्या मीना साळुंखे यांचा संगणक परिचालक संघटना जिल्हा चंद्रपूर यांचेकडून आनंदात सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक परिचालक यांना असणाऱ्या स्थानिक समस्यांबाबत देखील माहिती देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक परिचालक हे वरिष्ठांकडून प्राप्त होणाऱ्या आदेशांचे तसेच सूचनांचे कटकोर पालन करून इमाणे-इतबारे आपले काम जबाबदारीने पूर्ण करतात तरी देखील बऱ्याच समस्यांना आम्हाला समोर जावं लागतं व आमच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर समाधानकारक उपाययोजना झाल्या नाहीत याबाबत नवनियुक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी मॅडम यांना सांगण्यात आले. तसेच सतत थकीत राहणारे मानधन व त्यामुळे संगणक परीचालकांच्या कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ याबाबत पण सांगण्यात आलं.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर सर्व ऑनलाईन तथा ऑफलाईन कामे संगणक परिचालक करीत असून सुद्धा प्रकल्पाच्या व्यतिरिक्त कामकाजाचा बोजा आम्हा संगणक परिचालकांना सहन करावा लागतो तरी देखील नेहमी कामाचा तगादा लावून टार्गेट पद्धतीने कामे सांगून आम्हाला त्रास दिला जातो. अश्या अनेक समस्या व व्यथा नवनियुक्त रुजू झालेल्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मॅडम यांना सत्कार भेटी दरम्यान सांगण्यात आल्या असून आपल्या भविष्यातील कार्यकाळात आपण आम्हाला समजून घेऊन होणाऱ्या त्रासाची दखल घेता आम्हाला योग्य न्याय द्याल अशी अपेक्षा नवनियुक्त रुजू झालेल्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मीना साळुंखे मॅडम यांचे कडून बाळगण्यात आल्या. तसेच सर्व चंद्रपूर जिल्हा संगणक परिचालक संघटना याचे कडून नवनियुक्त रुजू झालेल्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मॅडम मीना साळुंखे मॅडम यांना भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रशांत डवले जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना जिल्हा चंद्रपूर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाल, जिल्हा सचिव मोहनाताई धोटे, तालुकाध्यक्ष भद्रावती मनीष बलकी, तालुकाध्यक्ष बल्लारशा संजय दरवडे, तालुकाध्यक्ष चंद्रपूर विकास ढोके, तालुका सचिव बल्लारशा प्रतीक नळे, उमेश पुलगामकर संगणक परिचालक गोंडपीपरी आदी संगणक परिचालक यांचे उपस्थित सत्कार करण्यात आला.